दिनांक 14 November 2018 वेळ 10:42 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » बॉम्ब सापडला, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्याचा अंदाज

बॉम्ब सापडला, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असल्याचा अंदाज

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
             वाडा, दि. २५ : वाड्यात जीवनात बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे, हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्कराने फेकलेला जीवनात बॉम्ब असल्याचा अंदाज आहे.
वाडा तालुक्यातील देवळी गावात जिवंत बॉम्ब सापडला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्कराने केलेल्या सरावाच्या वेळी हा बॉम्ब फेकला असावा, असा अंदाज स्थानिक रहिवाश्यांनी व्यक्त केला आहे. या बॉम्बची तपासणी बॉम्ब शोधक पथकाने केली आहे, देवळी गावात महेंद्र पाटील यांची शेतजमीन असौन त्यात बांधबंदिस्तच काम सुरु आहे. शेताक्त खोदकाम सुरु असताना अचानक एक लोखंडी वस्तू कामगारांना आढळली. पहिल्यांदा हा लोखंडाचा तुकडा असल्याचं त्यांना वाटलं. मात्र नीट फणी केली असता हा बॉम्ब असल्याचं लक्ष्यात आलं., तात्काळ वाडा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
वाडा पोलीस आणि तहसीलदार यांनी घटना सुटली फणी करून पोलीस बॉम्ब शोधक व नाशक पथक ठाणे ग्रामीण यांना पाचारण करण्यात आलं. पथकाने सायंकाळी या बॉम्बची पाहणी करून हा बॉम्ब जिवंत असल्याचा अंदाज व्यक्त करून याबात लास्करशी बोलून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top