दिनांक 19 February 2019 वेळ 3:42 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कृषी विभागामार्फत २ मी रोजी किसान कल्याण कार्यशाळा

कृषी विभागामार्फत २ मी रोजी किसान कल्याण कार्यशाळा

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
              पालघर, दि. २५ : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट्य ठेवून शासनातर्फे राज्यभरात ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २ मी रोजी राज्यात सर्व तालुका स्तरावर किसान कल्याण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत कृषी व कृषी संलग्न विभागाशी संबंधित विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठीचे धोरण व कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेमध्ये मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण व त्यात देण्यात आलेल्या खत व्यवस्थापन करण्यासाठी, औषधे फवारताना घ्यावयाची काळजी, शेतमाल काढणी पश्चात घ्यावयाची काळजी, शेतमाल स्वच्छता व प्रतवारीसाठी आवश्यक प्रशिक्षण, पशुचिकित्सा शिबीर, कापसावरील बॉण्ड अळीचे नियंत्रण, प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, शेतकऱ्यांचे बॅंक खाते, आधारकार्ड लिंकिंग साठी जनजागृती मोहीम, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी मार्गदर्शक घडीपत्रिकेचे वितरण, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आदी प्रमुख बाबींवर भर देण्यात येणार असून प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे, या माध्यमातून प्रगतिशील शेतकऱ्यांनी केलेली चांगली कामे इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी कृषी व कृषी संलग्न विषयांवरील चित्रफीत देखील दाखविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण मार्गदर्शन करणे हा आहे. या कार्यशाळेमध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, दुग्ध विकास अधिकारी, मत्स व्यवसाय, जिल्हा पणन अधिकारी, रेशीम उद्योगाचे अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग व इतर संलग्न विभागांचा सहभाग रहाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीत दिलेल्या प्रसिद्धिपत्रकातून देण्यात आली आहे. तरी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या कार्यशाळेस या कार्यशाळेस सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top