दिनांक 20 January 2019 वेळ 9:32 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » घरावर विद्युत खांब कोसळला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे विद्य मोठा अपघात टाळला.

घरावर विद्युत खांब कोसळला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे विद्य मोठा अपघात टाळला.

IMG-20180424-WA0347प्रतिनिधी
जव्हार, दि. २४ : तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायत हद्दीतील तामटीपाडा येथील एका घरावर चालू  विद्युत लाईनचा खांब कोसळून नुकसान झाले आहे मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.  
            मेढा पैकी तामटीपाडा येथील ईश्राम जाधव (४७) यांच्या घरावर २३ एप्रिल रोजी सोमवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घरासमोरील गंज लागलेला विद्युत खांब अचानक कोसळला. यात त्यांच्या घराची कौले फुटली आहेत. यावेळी मोठा आवाज होऊन जिवंत विद्दुत तारा जमिनीवर पडल्या असता येथील ग्रामस्थांनी तात्काळ सतर्कता दाखवत ये जा करणार्यांना रोखले. त्यावेळी मोठा अपघात टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान,  मेढा, लहान मेढा, तांमटीपाडा, कोरतड, पाटीलपाडा आदी परिसरात अजूनही अनेक विद्युत  खांब गंजून गेले आहेत. त्यामुळे अश्या  प्रकारची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही महिन्यातच पावसाळा सुरु होणार असल्याने अशी समस्या उदभवू शकते, अशी भीती ग्रामस्थानमध्ये आहे. त्यामुळे यामुळे यापूर्वीच येथी ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन जव्हार विद्दुत महामंडळाला लेखी निवेदन दिल्याने उपसरपंच परशुराम खुरकुटे यांनी सांगितले. या घटनेनंतर जव्हार विद्द्युत महामंडळाने वेळीच लक्ष घालून गंज लागलेले विद्दुत खांब बदलून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दुसरीकडे हि घटना घडल्यापासून तांडीपाड्यातील ग्रामस्थांना ऐन लग्न सराईच्या काळात व वाढलेल्या तापमानामुळे उकाडा वाढला असताना विद्दुत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन कराव लागत आहे. याबात उपसरपंच खुरकुटे आणि ग्रामस्थांनी काळ विदुयत महामंडळाकडे चौकशी केली असता साहेब रजेवर गेले आहेत. ते आल्यावर पाहतील, असे उत्तर येथी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले. त्यामुळे विद्द्युत पुरवठा नेमका कधी सुरळीत होईल, असा प्रसन्न ग्रामस्थांना पडला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top