दिनांक 20 January 2019 वेळ 8:55 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » रुईघर बोपदारी लाईन धोकादायक.  वाकलेले विद्युत पोल पडून अपघाताचा धोका.

रुईघर बोपदारी लाईन धोकादायक.  वाकलेले विद्युत पोल पडून अपघाताचा धोका.

Jawhar News 2प्रतिनिधी

             जव्हार, दि. 22: जव्हार तालुक्यातील दादरानगरहवेली या केंद्र शासित प्रदेशाला लागून असलेली रुईघर, बोपदरी ग्रामपंचायत आहे. मात्र या गावांकडे येनार्‍या विद्युत लाईनचे पोल वाकले आहेत. वाकलेल्या पोलांपासून विद्युत लाईन धोक्कादायक बनली आहे. ही विद्युत लाईन रस्त्याच्या कड्याला लागून असल्याने रस्त्यावर पोल पडून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

दाभेरी गावातील ट्रान्संफॉर्मवरून रुईघर, बोपदरीकडे विद्युत येते. मात्र याकडे येणार्‍या लाईनचे संपूर्ण विद्युत पोल गंजून विद्युततारा खाली पडायला आल्या आहेत. ही विद्युत लाईन रोडलगत असल्याने या रोडवरून रोज वाहने आणि नागरिकांची रोज वर्दळ असते. मात्र रस्त्यालगत वाकलेल्या विद्युत पोलांमुळे वाहन चालक व ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून येजा करावी लागत आहे. रुईघर बोपदरीकडे येणार्‍या विद्युतच्या गंज लागून वाकलेल्या विद्युत पोलांचे काम एप्रिल व मे महिन्यापूर्वीच करावे अशी ग्रामस्थांची मागणी असून, पावसाळ्यापूर्वी वाकलेल्या पोलांचे काम केलं नाही. तर ग्रामस्थांना अंधारात रहावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top