दिनांक 20 January 2019 वेळ 9:30 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनसेचा पालघर रेल्वे स्थानकात गोंधळ

मनसेचा पालघर रेल्वे स्थानकात गोंधळ

बोईसर वार्ताहर IMG-20180420-WA0033
             बोईसर, दि. २० : रेल्वे प्रशासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या पास धारकांना आरक्षित डब्या
तून प्रवास करता येणार नाही असे फर्मान काढले आहे व आरक्षित शयनयान डिब्बो मे यात्रा की अनुमती नही अश्या प्रकारचा स्टॅम्प पासवर मारण्यात आला  आहे , ह्या विरोधात पालघर जिल्यातील प्रवाश्यांमध्ये

व आरक्षित शयनयान डिब्बो मे यात्रा की अनुमती नही अश्या प्रकारचा स्टॅम्प पासवर मारण्यात आला  आहे , ह्या विरोधात पालघर जिल्यातील प्रवाश्यांमध्ये प्रचंड असंतोष व उद्रेक निर्माण झाला असून , ह्या असंतोषाला वाट मोकळी करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे ह्यांच्या नेतृत्वा खाली पालघर रेल्वे स्टेशन प्रबंधक कार्यालया समोर प्रचंड गोंधळ घालून रेल्वे प्रशासनाच्या निर्णयचा विरोध करण्यात आला.

               गेल्य आठवड्यात दररोज प्रवास करणाऱ्या पास धारकांच्या पासवर आरक्षित डब्यामध्ये प्रवास नाकारण्याचा शिक्का दिसताच प्रवासी बांधवांनी संताप व्यक्त केला होता.  रेल्वेच्या या निर्णयावर आज पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांनी पालघर स्टेशन प्रबंधकाचे कार्यालय गाठून त्यांना याबाबत जाब विचारला. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने ह्या वेळी रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय ताबोडतोब माघे घेऊन प्रथमतः रेल्वे प्रवाशी पासधारक डब्यांची संख्या वाढवावी , पालघर जिल्ह्यातील प्रत्येक स्टेशनवर आद्ययावत सोई सुविधा पुरवाव्यात व नंतरच प्रवाशांना विश्वासात घेऊन कुठलाही निर्णय घ्यावा असे निक्षून बजावण्यात आले त्यावर स्टेशन प्रबंधक ह्यांनी डी. आर. एम. कार्यालयाशी संपर्क साधून शिष्टमंडळाशी चर्चा घडवून आणली
            या चर्चेदरम्यान रेल्वेने पासधारकां बाबत काढलेला अन्यायकारक फतवा रद्द करावा अशी मागणीसंखे यांनी केली. त्यावर डीआर एम कार्यालय व स्टेशन प्रबंधक ह्यांनी जो पर्यंत या बाबत डीआरएम  कार्यालय सोबत सयूंक्त बैठक होत नाही तो पर्यंत पसधारकांची कुठल्याही प्रकारे अडवणूक केली जाणार नाही . ह्या मुळे तूर्तास रेल्वे प्रवाश्यांना दिलासा मिळाला असून जर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय कायम स्वरूपी रद्द केला नाही तर तसेच रेल्वे सोई सुविधांच्या बाबती मध्ये तात्काळ उपाय योजना केल्या गेल्या नाहीत तर मनसे रेल रोको सह तीव्र आंदोनल छेडेल असा इशारा देण्यात आला .
       यावेळी डहाणू वैतरणा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री. शेट्टी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष अनंत दळवी मनवीसे जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी, शहर अध्यक्ष सुनील राऊत , मनवीसे उपजिल्हा अध्यक्ष धीरज गावड,  उपतालुका अध्यक्ष मंगेश घरत, संदीप किणी, सुनील पाटील, माजी पालघर शहर अध्यक्ष दिनेश गवई , उपशहर  अध्यक्ष उदय माने, हेमंत घोडके , धनंजय झुंजारराव विभाग अध्यक्ष वैभव नाईक, वैभव घरत व शैलेश हरमळकर, सुनील निकम, तुलशी जोशी , मनोज पाटील, नयन पाटील , आकाश भोईर , रमेश भोईर , कल्पेश पाटील , व कार्यकर्ते  उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top