दिनांक 20 January 2019 वेळ 8:40 PM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » मनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.

मनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.

Rajtantra_EPAPER_200418_1_040402प्रतिनिधी
             मनोर, ता. १९ : येथील चिल्हार- अवदानी ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पालघर तालुका युनिटमार्फत काल बुधवारी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीवर माकपचीच सत्ता असताना आपले प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्याची वेळ आली.
           मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार आवढानी ग्रामपंचायती अंतर्गत 18 पाडे आणि  वस्त्या आहेत.येथील पिण्याच्या पाण्याची समस्या,प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी,शौचालयाच्या लाभार्थीना निधी वाटप,अनधिकृत बांधकामे,जॉब कार्ड धारकांना न मिळणारी रोजगार हमीची कामे,पाड्या पाड्यात सूचना फलक,महामार्ग ओलांडताना वारंवार होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उड्डाण पूल बांधण्याचा ठराव संबधित यंत्रणेला देण्यात यावा आणि महामार्गावरील हॉटेलांचे सांडपाणी शेतीमध्ये सोडलं जात असल्याने शेतीचं नुकसान होत असून परिसरात दुर्गंधी येत असल्याचा समस्या संदर्भात किसान सभेचे राज्य समिती सदस्य राजा गहला यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला होता.
           मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनातील मागण्यांबाबत झालेल्या चर्चेनंतर त्यांच्या 10 मागण्या मान्य करून एक महिन्यात उचित कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामसेवक उमेश गुहे यांनी दिल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला.
           यावेळी तालुका सचिव सुदाम धिंडा, किसान सभेचे तालुका अध्यक्ष सुनील सुर्वे,जनवादी महिला संघटनेच्या हिना वनगा, पालघर शहर अध्यक्ष बबलू त्रिवेदी,ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
२०११ अगोदर ची पाच वर्षे सोडल्यास स्थानेपासून ग्रामपंचायतीवर
मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाची सत्ता आहे.तरीही गावच्या रस्ते, पाणी
आणि वीज यासारख्या समस्या सोडविण्यासाठी आपल्याच पक्षाची
सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याची वेळ यावी .हे येथील
ग्रामस्थांचे दुर्दैव आहे.
वसंत रावते. विभाग अध्यक्ष, मनसे
मार्क्सवादी कॉमुनिस्ट पार्टी मार्फत तालुक्याच्या पूर्व भागातील
ग्रामपंचायतीवर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मोर्चे
घेण्यात येणार आहेत.त्याचाच हा भाग होता.
चिल्हार -आवधानी ग्रामपंचायत

comments

About Rajtantra

Scroll To Top