दिनांक 16 January 2019 वेळ 3:19 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कुडूस एस.टी. थांब्याला भाजी विक्रेत्यांचा विळखा.

कुडूस एस.टी. थांब्याला भाजी विक्रेत्यांचा विळखा.

2प्रतिनिधी:
कुडूस दि. 18 : कुडूस हे वाडा महामार्गावरील मुख्य थांब्याचे ठिकाण असून येथे ठाणे, मुंबई, भिवंडी, कल्याण तसेच जव्हार पालघर वाडा याठीकाणी ये जा करणार्‍या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र एस. टी. थांब्यालाच भाजी विक्रेत्यांनी वेढल्याने प्रवाशांना एसटीत चढण्यास व उतरण्यास मोठी कसरत करावी लागते.
कुडूस हे बाजारपेठेचे मोठे ठिकाण असुन येथे इंग्रजी, मराठी व हिन्दी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या मुलांच्या सात संस्था आहेत. हे सर्व प्रवासी व विद्यार्थी एस टी ने प्रवास करणारे असल्याने त्यांना भाजी विक्रेत्यांच्या टोपल्या ओलांडून जातांना त्रास होतो. शिवाय महिलांना चुकून धक्का लागल्यास भांडणाला सामोरे जावे लागते. यातच भर म्हणून येथील किराणा दुकानदार दुकाना बाहेर रस्ता अडवून आपल्या मालाची पोती ठेवीत असल्याने प्रवाशांनी चालायचे कोठून हा प्रश्न जटील झाला आहे. शिवाय हातगाडी व अनधिकृत टपरी धारक वाटेल तेथे आपले बस्तान मांडून आहेत.
कुडुस या ठिकाणी मोठी ग्रामपंचायत असुन शेजारीच पोलीस चौकी आहे. मात्र पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन या अतिक्रमणा बाबत कोणतीच भुमिका घेत नाहीत. त्यामुळे हातबांधून आहेत. पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाला वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व वाडा तहसीलदार यांनी समज द्यावी अशी येथील विद्यार्थ्यांची व प्रवाशांची मागणी आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top