दिनांक 20 January 2019 वेळ 8:11 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » ग्राहक संरक्षण परिषद बरखास्त करा प्रकाश अभ्यंकर यांची मागणी

ग्राहक संरक्षण परिषद बरखास्त करा प्रकाश अभ्यंकर यांची मागणी

Dahanu News 2
डहाणू दि. 18: जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक संरक्षण परिषद म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय असून अशी बिनकामाची परिषद बरखास्त करावी अशी मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टिसचे सचिव प्रकाश अभ्यंकर यांनी पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्याऐवजी जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर ग्राहक न्यायालय स्थापन होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती अभ्यंकर यांनी केली आहे.
पालघर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये ग्राहकांच्या तक्रारी स्विकारल्या जातात. त्यांच्या सुनावणीसाठी तारखांवर तारखा दिल्या जातात. आणि शेवटी ग्राहक न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे सर्वसामान्य तक्रारदार व प्रशासनाचा बहुमूल्य वेळ व्यर्थ जात असल्याची टिका देखील अभ्यंकर यांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top