दिनांक 16 January 2019 वेळ 3:53 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाड्यात शिवजयंती उत्साहात साजरी

वाड्यात शिवजयंती उत्साहात साजरी

Vada News 3प्रतिनिधी
वाडा, दि. 18: वाडा शहर शिवसेना शाखेच्या वतीने आज शिवजयंती उत्सव गुलाल उधळत ढोलताश्यांच्या गजरात, मोठ्या जल्लोषात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनूसार दरवर्षी अक्षयतृतीयेला शिवसेना वाडा शहर शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात येते.

शहरातील गणेश मैदान येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे सर्व उपस्थित मान्यवरांनी पूजन करून महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमा दरम्यान कार्तिकी दीपक साळुंखे या चिमुकलीने शिवरायांचा इतिहास आपल्या गोड वक्तृत्वाने उलगडला. छत्रपती आपल्या जीवनातील कठीण प्रसंगांना कसे सामोरे गेले हे आपल्या धारदार शब्दात कुणाल भानुशाली याने सांगितले तर केवळ शिवाजी महाराज यांची जयंती किंवा उत्सव साजरे करतांनाच छत्रपतींना अपेक्षित असणार्‍या स्वराज्यातील आदर्श नागरिक, राज्यकर्ते यांची कर्तव्ये आदींविषयी इतिहासातील दाखले देत दर्शन काबाडी या तरुणाने अभ्यासपूर्ण शैलीत माहिती दिली.
यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, उप जिल्हा प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटक संगिता ठाकरे, विधानसभा संपर्क संघटक मनाली फोडसे, तालुका प्रमुख उमेश पटारे, भाजप तालुकाध्यक्ष संदीप पवार, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश केणे, उपनगराध्यक्षा ऊर्मिला पाटील, भाजप गटनेते मनिष देहेरकर, धनंजय पष्टे, युवासेनेचे तालुका अधिकारी निलेश पाटील, आदींसह नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व असंख्य शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
सायंकाळी काढण्यात आलेली मिरवणूक ही उत्सवाचे मुख्य आकर्षण होते. यामध्ये आदिवासी बंधू भगिनींचे तारपा नृत्य, नाशिकचा ढोल ताशा व मर्दानी खेळ, लेझीम पथक यांनी सारा परिसर दुमदुमून गेला तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घोडेस्वार मावळ्यांसह ’हर हर महादेव’ अशा घोषणा देत निघालेला शिवकालीन दृश्य निर्माण करण्यात आले होते. या मिरवणुकीत शेकडो शिवभक्त नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top