राजतंत्र न्यु नेटवर्क
दि. १६ : मुंबईतील जुहू येथून सुरतकडे निघालेल्या फ्युचरा ट्रॅव्हल फ्लाईंग कंपनीच्या हेलिकॉप्टरचे आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास darvaj
यात विघड झाल्याने इमर्जन्सी लेन्डिंग करण्यात आले. पालघर तालुक्यातील कोळगांव पोलीस परेड ग्राऊंडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत तात्काळ हे हेलिकॉप्टर उतरविण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नंदनिकेतन हजार स्टील प्लांट उद्योग समूहाच्या दोन अधिकाऱ्यांसह पायलट केप्टन जे. के. राव व सहाय्य्क पायलट अभियंता नीता असे ४ जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत होते. बिघाड दुरुस्त झाल्यानंतर हेलिकॉप्टर सुरतकडे रवाना झाले.
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर, दि. १६ : दरवाज्यात बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग