दिनांक 18 June 2019 वेळ 6:47 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाच्या अमंलबजावणीसाठी सातपाटी येथे सार्वजनिक बैठक सपंन्न

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाच्या अमंलबजावणीसाठी सातपाटी येथे सार्वजनिक बैठक सपंन्न

 

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण (NCRMP) 1राजतंत्र न्यु नेटवर्क
           पालघर, दि. १६ : रात्री चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात सध्याची कार्यरत विधत प्रणाली भूमिगत करण्याचे काम सुरु होणार असून त्या अनुषंगाने सातपाटी येथे नुकतेच सार्वजनिक सल्ला सभेचे आयोजन करण्यात आले होते. भूमिगत केबल टाकण्यासाठी व रस्त्याचे खोदकाम करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन आमदार अमित घोडा व जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या बैठकीत केले.
या प्रकल्पाच्या कामाची माहिती नागरिकांना देणे, योजनेची अंमलबजावणी करताना रहिवाशांना, व्यावसायिकांना तसेच सामान्य जनतेला या प्रकल्पाचे होणारे फायदे, तसेच अडथळे व गैरसोयी आदींबाबत महाराष्ट्र राज्य विदयुत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासाठी एकूण १७ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च येणार असून या यंत्रणेद्वारे चक्रीवादळ येणाऱ्या संभाव्य परिसरात चक्रीवादळामुळे कमीत कमी हानी होण्यासाठी योग्य व सशक्त पायाभूत सुविधा राबविण्यात येईल. या सार्वजनिक सल्ला सभेला विविध मच्छिमार संघटनेचे प्रमुख व प्रतिनिधी, पेट्रोलपंप, बॅंक, हॉटेल, असोशियेणाचे प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, वाहतूक, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, रस्त्यावरील तात्पुरते दुकानदार, फेरीवाले, विक्रेत्यांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, गृहनिर्माण सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक तसेच विशेषतः पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक, दूरध्वनी आदी सार्वजनिक सुविधांच्या कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top