दिनांक 22 March 2019 वेळ 1:56 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव

विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसीलदाराला घेराव

IMG-20180413-WA0026वार्ताहर 
           बोईसर, दि. १६ : पालघर तालुक्यातील गावांना सतवणाऱ्या पाणीटंचाई प्रश्नापासून ते रोजगार हमी योजनांविषयी अनेक प्रश्न घेऊन आज आदिवासी बांधवानी एकत्र येत श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पालघर तहसीलदारांना घेराव घातला.
           पालघर तालुक्यातील बोईसर विधानसभेत मोडणाऱ्या सावरे, उबरखंड ,जुईपाडा, लालोंडे, टेपरीचा पडा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे ट्रेंकरद्वारे पाणी पुरवावे या मागणीसाठी वारंवार तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन देखील दुर्लक्ष केले जात असल्याने याचा जाब तहसीलदारांना विचारण्यात आला. तसेच पाणी टंचाईभागांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी येत्या काळात ठोस उपाययोजना आखावी व अमलात आणावी अशी मागणी करण्यात आली. वनविभाग समितीकडे प्रलंबित असलेले सामूहिक तसेच वैयक्तिक वनदावे, सावरे ग्रामपंचायत हद्दीतील रोजगार हमी योजनेतील गोंधळ, कातकरी समाजातील बांधवांची रखडलेली रेशनकार्ड प्रक्रिया अश्या विविडसह प्रश्नावर यावेळी तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. दरम्यान, या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर चर्चा करून त्या सोडवल्या जातील, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला.

comments

About Rajtantra

Scroll To Top