दिनांक 22 February 2019 वेळ 3:07 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » औद्योगिक कारखान्यांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यावर भर – उद्योगमंत्री सुभाष देसाई

औद्योगिक कारखान्यांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यावर भर – उद्योगमंत्री सुभाष देसाई

IMG20180415180956प्रतिनिधी
              बोईसर, दि. १६ : तारापूर औद्योगिक वसाहत सर्वात मोठी आहे.  प्रत्येक उद्योगामध्ये ८०  टक्के स्थानिक कामगार काम करत नसतील तर हलगर्जीपणा करणाऱ्या उद्योगांवर  कायद्याचा बडगा उगारत स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे रोजगार विभागातर्फे राज्यात सर्वत्र  रोजगार मेळावे भरवून बेरोजगारांना रोजगाराची संधी देणारी पहिली बोईसर औद्योगिक वसाहत ठरेल असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांनी बोईसरमध्ये केले. ते शिवसेनेच्या वतीने रविवारी ( दि. १५ ) आयोजित करण्यात आलेल्या  निर्धार मेळाव्यात  बोलत होते. 
               शिवेनेच्या  बोईसर जिल्हाप्रमुखपदी वसंत चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर आगामी पालघर  लोकसभा पोटनिवडणूक व पुढील सार्वत्रिक विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रथमच कार्यकर्त्यांचा  निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे , संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, सहसंप अमित घोडा, सह संर्कप्रमुख केतन पाटील , माजी जिल्हाप्रमुख उदय पाटील व प्रभाकर राऊळ संपर्क महिला संघटक दीपा पाटील,  ममता चेंबूरकर, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर , उपजिल्हा संघटका भावना किणी ,उपजिल्हाप्रमुख राजेश कुट्टे , तालुका प्रमुख सुधीर तमोरे, नीलम संखे, तालुका महिला संघटका नीलम म्हात्रे , जगदीश धोडी ,वैभव संखे उपस्थि उपस्थित होते .
             यावेळी अधिक मार्गदर्शन करताना मंत्री देसाई म्हणाले की,बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. स्थानिकांना रोजगार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. येथील बेरोजगारीचा प्रश्न सुटल्याशिवाय सामाजिक प्रगती होणार नाही असे म्हणत  राज्यात चाललेली  शिवसेनेची घोडदौड थांबवू  शकत नाहीज जनतेच्या मनात असलेले  राज्यात व केंद्रात  शिवसेनेचा  भगवा फडकविण्याचे स्वप्न जनता पूर्ण करणार आहे . कारण शिवसेना शेतकरी,कष्टकरी, कामगार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि पुढे देखील उभी राहील असे म्हणाले.  तसेच पालघर जिल्ह्यातील  येणाऱ्या प्रकल्पांना येथील  ग्रामपंचायती    विरोध करत  असतील तर  प्रकल्प  जनतेच्या माथी लादू नयेत.  बुलेट ट्रेन पालघर जिल्ह्यातून जाणार या ट्रेन मध्ये  ना मुबईचा मराठी माणूस ना पालघरचा माणूस  जाणार आहे.  मग ही ट्रेन फक्त अहमदाबादच्या शेअर बाजारातील  दलालांकरिता आहे असा आरोप करत सहकारी पक्ष भाजपवर त्यांनी सडकून टीका केली.    एक लाख कोटीचे कर्ज घेऊन बुलेट ट्रेन प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यापैकी  महाराष्ट्रला २५  टक्के  कर्जाचा वाटा  उचलावा लागणार आहे . शेअर दलालांसाठी आम्ही कर्जाचा भार का उचलावा असा सवाल करत  या रक्कमेत  रस्ते , दवाखाने, शाळा, काढा असा टोलाही देसाईंनी भाजपला  लगावला.
              शिवसेना जरी भाजपबरोबर सत्तेवर असली तरी जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे उभे राहते. असे म्हणत निवडणुका  आल्या  की इतर पक्ष कामाला लागतात, मात्र निवडणुका असो व नसो निवणुकांची भीती आणि चिंता  शिवसेनेला कधी नसते. याचे कारण शिवसैनिक अहोरात्र लोकांच्या सेवेसाठी  काम करत असतो.  त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना पालघर जिल्ह्यात निश्चितपणे भगवा फडकावून राज्यात स्वबळावर सत्ता आणेल असा आशावाद सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

comments

About Rajtantra

Scroll To Top