दिनांक 22 February 2019 वेळ 3:19 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » किरकोळ भाजीपाला विकुन हातावर पोट भरणा-या आदिवासींवर वाडा व्यापारी असोशियशनचा अन्याय

किरकोळ भाजीपाला विकुन हातावर पोट भरणा-या आदिवासींवर वाडा व्यापारी असोशियशनचा अन्याय

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
             वाडा, दि. १६ : येथील व्यापारी असोसिएशनने सोमवारी ( दि. १६ ) अमावास्या असल्याचे कारण पुढे करून संपूर्ण बाजारपेठ सक्तीने बंद ठेवली.विशेषतः खेडोपाड्यातून किरकोळ भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या आदिवासींनाही बाजारपेठेत भाजीपाला विक्री करण्यास मज्जाव करुन त्यांना परत पाठविल्याने या आदिवासींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दररोज दोनचारशे रुपयांचा भाजीपाला विकुन हातावर पोट भरणाऱ्या या आदिवासींवर वाडा व्यापारी असोशियशनने अन्याय केल्याने असोसिएशनच्या सर्व पदाधिका-यांवर आदिवासी नेते भास्कर दळवी यांनी तिव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.
             वाडा तालुक्यातील अनेक खेड्यातील आदिवासी, बिगर आदिवासी यांनी आपल्या परसदारी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लावला आहे.या आदिवासींना वाडा ही तालुका ठिकाणची एकमेव बाजारपेठ असल्याने या बाजारपेठेत मिळेल त्या ठिकाणी बसुन दोनशेहुन अधिक आदिवासी बांधव दररोज दोनचारशे रुपयांचा भाजीपाला विकत असतात. मात्र वाडा व्यापारी असोशियशनने हातावर पोट भरणाऱ्या आदिवासींना अमावास्याचे कारण पुढे करुन भाजीपाला विक्रीस मज्जाव केला.बरेचसे आदिवासी भगिनी डोक्यावर भाजीपाल्याच्या टोपल्या घेऊन आल्या होत्या. मात्र त्यांना वाडा व्यापारी असोशियशनने कुठेही बसु न दिल्याने माघारी जावे लागले.
           अमावास्याचे कारण पुढे करुन बाजारपेठ बंद ठेवणा-या वाडा व्यापारी असोशियशनने मात्र सरकारी कार्याजवळील हाँटेल्स सुरु ठेवण्याची कशी परवानगी दिली असा सवालही भास्कर दळवी यांनी केला आहे.
             खेडोपाड्यातून किरकोळ भाजीपाला विकण्यासाठी येणाऱ्या आदिवासी, बिगर आदिवासींना यापुढे वाडा व्यापारी असोशियशनने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा भास्कर दळवी यांनी दिला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top