
डहाणू, द. १५ : नुकत्याच नेपाळमधील घोगरा येथे पार पडलेल्या झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत भारतीय मुले व मुलींच्या संघांनी अंतिम फेरीत नेपाळच्या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले होते. सदर भारतीय मुला मुलींच्या संघात समावेश असलेल्या नरेशवाडीच्या सोमय्या शिक्षण संस्थेतील मुले व मुलींचा काल 12 एप्रिल रोजी विद्याविहार मुंबई येथे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविल्याबद्दल सर्व खेळाडू व प्रशिक्षक संध्या अशोक वाघमारे यांचे मंत्री महोदयांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सोमय्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीरभाई सोमय्या आदी मान्यवर उपस्थित होते.