डहाणूमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साजरी

0
270

LOGO-4-Onlineराजतंत्र मिडिया

        डहाणू दि. १५: शहरातील मसोली- आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डहाणू तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून माह्यावंशी समाजाचे लोक उपस्थित होते. महिलांची देखील उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करुन आदरांजली वाहिली. यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांबद्दल वक्तृत्व केले. या दिनाचे औचित्य साधून दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्या भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

राज्यघटना समजून घेतल्यानंतरच आपण माणूस म्हणून जगू शकतो ! – संजीव जोशी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ते समजून घेतल्याशिवाय त्यांचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येक नागरिकाने भारतीय राज्यघटना समजून घेतली पाहिजे असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी आंबेडकर नगर येथे बोलताना केले. लोकांनी लोकशाही व्यवस्थेमध्ये अधिकाधिक सक्रिय झाल्याशिवाय देश समृद्ध होणार नाही असेही विचार जोशी यांनी मांडले. जोशी यांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रचार व प्रसाराचे काम हाती घेतले असून या मोहिमेअंतर्गत जोशी यांचे आजचे हे २५ वे व्याख्यान होते.

आज भारतीय राज्यघटना सविस्तरपणे समजून घेतल्यानंतर मला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटत असून एक नवी दिशा सापडल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक नागिन देवा यांनी कार्यक्रमानंतर बोलताना व्यक्त करुन संजीव जोशी यांचे व्याख्यानाबद्दल आभार मानले. तसेच उपस्थितांनी पुन्हा असा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली.

Print Friendly, PDF & Email

comments