दिनांक 16 January 2019 वेळ 3:43 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » उद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न 

उद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न 

IMG-20180414-WA0359प्रतिनिधी
जव्हार दि. १३ : शहरातील बायफ प्रशिक्षण केंद्रात अनुसूचीत जाती/जमाती करिता डाँ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत  अदिवासी युवक युवतीसाठी दि. २७ मार्च २०१८ ते  दि.१३ एप्रिल २०१८. या कालावधीत निवासी १८ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता .त्याची आज सांगता झाली. हा कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व महाराष्ट्र उद्योग  व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष यांच्या वतीने राबविण्यात आला.
              ह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी  प्रशांत साळवे , बायफचे संदिप काकडे, महाराष्ट्र  उद्योजकता विकास  केंद्र विभागीय अधिकारी रेखा संझगिरी , सह्याद्री रिसाँर्टचे विजय वझे ,  उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरूवात आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा, सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुत्र संचालनाची धुरा महाराष्ट्र उद्योजकता विकास  केंद्र पालघरचे प्रकल्प अधिकारी संजय भामरे  यांनी सांभाळली. या १८ दिवसीय प्रक्षिक्षण कार्यक्रमाबाबत बोलताना प्रशिक्षणार्थी प्रकाश मोर, धीरज झोले, भारत गवारी, सुभाष रड्या, रत्नप्रभा गावित यांनी आपले मनोगत व अनुभव व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे  वाटप करण्यात आले .
             प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतांना रेखा संझगिरी म्हणाल्या कि,तुम्ही उद्योजक होताना तुम्ही इतरांना ही रोजगार उपलब्ध  करून दिला पाहिजे म्हणजे सर्वांना रोजगार मिळेल . तर उद्योजक विजय वझे यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्या अंगी जिद्द ,मेहनत व कष्ट करण्याची हिंम्मत असण्याचे गुण अंगी असले पाहिजेत .आदिवासी विकास प्रकल्पचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी  प्रशांत  साळवे मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, तुमचे उद्योजकतेचे कुठलेही प्रश्न ,मार्गदर्शन योजनांची माहिती आमच्या   कार्यालयात मिळू शकेल .तुम्ही उद्योजक होताना जर एकत्रित  गट तयार करून उद्योग केला तर तो  अधिक फायदेशीर ठरु शकतो .बायफचे संदिप काकडे म्हणाले कि,शेती व्यवसायासाठी आमची संस्था यशस्वी उपक्रम राबवित आहे .शेती उद्योगासाठी आमचे मोलाचे सहकार्य तुम्हांला मिळू शकते .उद्योजकता प्रशिक्षणार्थींच्या उत्साहाला त्यांनी  प्रोत्साहन दिले.
               कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय भामरे यांनी केले .हा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी .सतीश भामरे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र पालघर, बायफचे  सुधीर वागळे , संदिप काकडे  ,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र  पालघरचे प्रकल्प अधिकारी संजय भामरे   , मुंबई चे प्रकल्प अधिकारी  सुबोध बायस , सहाय्यक   संजय काकड ,अंगद शर्मा व बायफ संस्था व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मोलाचे परिश्रम घेतले .तर  राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

comments

About Rajtantra

Scroll To Top