राजतंत्र न्युज नेटवर्क
बोईसर, दि. १३ : लघुशंकेला जाऊन येते असे सांगत एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या हातात ७ महिन्यांचे बाळ सोपवून पळ काढल्याची घटना बोईसर येथे घडली आहे.
१२ एप्रिल रोजी जणूनी पद येथे राहणारी सौ. गिता टोनी दोंडा ही २५ वर्षीय महिला आपल्या घराजवळ उभी असताना एक अज्ञात महिला तिच्याकडे आली व मी लघुशंकेला जाऊन येते तोपर्यंत माझ्या बाळाला सांभाळा असे म्हणून आपले ७-८ महिन्यांचे बाळ गिता यांच्या हातात सोपवून, त्यानंतर अनेक तास उलटूनही सदर महिला बाळाला घ्यायला आली नाही. सदर महिलेने बाळ आपल्याकडे सोपवून पळ काढल्याचे समजल्यावर आज शुक्रवारी गिता यांनी मुलबाळ नसलेल्या नीता गणेश काटे या महिलेकडे हे बाळ संभाळण्याकरिता दिले. नीता यांनी याबात बोईसर पोलिसांत माहिती दिल्यानंतर याबात चौकशीसाठी हे बाळ महिला व बाळ कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. तरी या बाळाबाबत कोणतीही माहिती असल्यास बी बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या ८६६९६०४०४३ अथवा ८६६९६०४०४४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.