दिनांक 22 February 2019 वेळ 3:06 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनोर : मोबाईल दुकान फोडणारे तीन चोरटे गजाआड!

मनोर : मोबाईल दुकान फोडणारे तीन चोरटे गजाआड!

राजतंत्र न्यु नेटवर्क
             Rajtantra_EPAPER_140418_1_120454मनोर, दि. १३ : मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या मस्तान नाक्यावर असलेल्या आशिष मोबाईल स्टोरमध्ये चोरी करत दिड लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या तीन चोरट्याना गजाआड करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. त्यांच्याकडून एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. २४ मार्च रोजी पहाटे हि घटना घडली होती,

या तिघ्यां चोरटयांनी मस्तान नाक्यावरील कोहिनुर बिल्डिंगमधील आशिष मोबाईल स्टोरचे शटर कटरच्या सहाय्य्यने तोडून दुकानात प्रवेश केला होता. त्यानंतर मोबाईल आणि लॅपटॉप मिळून १ लाख ४७ हजार ६४४ रुपयांचा ऐवज लंपास केला होता. ही घटना सी. सी. ती. व्ही. मध्ये कैद झाल्याने पोलिसांना तपास करण्यास गती मिळाली होती. त्यानुसार पालघर स्थानिक गुन्हे शाखा विभागाच्या बोईसर युनिटने तपास करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, चोईकाशी दरम्यान तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांच्याकडून चोरीला गेलेले विविध कंपन्यांचे मोबाईल हॅन्डसेट, लॅपटॉप व गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा एकूण ३ लाख २० हजार ३०८ रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. सहाय्य्क पोलीस निरक्षक एम. चाळके, पोलीस हवालदार विनायकांत ताम्हणे, भारत पाटील, पोलीस नाही दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, सचिन मर्दे, एन. पाटील व पोलीस शिपाई एन. जनाथे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top