दिनांक 19 February 2019 वेळ 3:41 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कुडूस येथे स्वाभिमान रिक्षा युनियनचे उदघाटन

कुडूस येथे स्वाभिमान रिक्षा युनियनचे उदघाटन

IMG-20180413-WA0000प्रतिनिधी
कुडूस, दि. १३ : कुडूस परिसरात खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक व मालक यांनी   स्वाभिमान रिक्षा युनियनची स्थापना केली असून ह्या युनियनचे उद्घाटन गुरूवारी ( दि. १२ )  कुडूस नाक्यावर करण्यात आले. 
             रिक्षा चालक व मालक यांच्या अनेक प्रश्नांची तड लावणे, प्रवाशांना चांगली सेवा देणे, शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध व महिलांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील यांनी तालुकाध्यक्ष रविंद्र मेणे यांच्या सहकार्याने स्वाभिमान पक्षांच्या प्ररणेने वाडा तालुका स्वाभिमान रिक्षा चालक व मालक युनियनची स्थापना केली. युनियनच्या नामफलकाचे अनावरण माजी सरपंच ईरफानभाई सुसे, सामाजिक कार्यकर्ते रामदास जाधव व अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
             कुडूस परिसरातील विवीध  गावातील रिक्षा चालक व मालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या वेळी बोलतांना रामदास जाधव यांनी रिक्षा चालक व मालक यांच्या वाहतूक व्यवस्थेबाबत अनेक अडचणी आहेत, तक्रारी आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व तक्रारीची दाद घेण्यासाठी युनियनची गरज होती. स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील यांनी ही अडचण लक्षात घेवून युनियन स्थापन केली. त्याबद्दल जाधव यांनी समाधान व्यक्त केले. तर प्रमोद पवार यांनी उध्दट व सेवाभावी रिक्षा चालकांची उदाहरणे देवून आपण स्वाभिमान संघटनेच्या सेवाभावी वृत्तीची जाणीव ठेवून प्रवासी वाहतूकीत आदर्श निर्माण कराल व विद्यार्थ्यांना, महिलांना, वृध्दांची योग्य ती काळजी घेवून वाहतूक सेवा कराल अशी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमात युनियनचे संस्थापक  जितेश पाटील यांनी युनियन सेवाभावी वृत्तीची जाणीव ठेवून प्रवासी वाहतूक करील. रिक्षा चालकांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू त्याचप्रमाणे रंजल्या गांजल्या प्रवाशांना प्रसंगी मोफत सेवा दिली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
          या कार्यक्रमाप्रसंगी प्रितेश  पटेल, सचिन पाटील, कल्पेश जाधव संघटनेचे अध्यक्ष फरजान भुरे व पदाधिकारी  उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top