दिनांक 20 April 2018 वेळ 12:51 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडयात प्लास्टिक मुक्तीसाठी नगरसेवकांची रॅली

वाडयात प्लास्टिक मुक्तीसाठी नगरसेवकांची रॅली

IMG_20180412_154311राजतंत्र न्युज नेटवर्क
            वाडा, दि. १२: स्वच्छ वाडा, सुंदर वाडा व प्लास्टिकमुक्त वाडा शहर अभियानाअंतर्गत वाडा नगरपंचायत प्रशासनामार्फत गुरुवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘प्लास्टिकचा वापर बंद करा, वाडा शहर प्लास्टिक मुक्त करा’ आदी घोषणा देत नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर व उपनगराध्यक्षा उर्मिला पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, नगरसेविका, नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी  संपूर्ण शहरात रॅलीद्वारे फिरून जनजागृती केली.
            या रॅलीद्वारे वाडा शहरातील नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे तसेच वाडा शहर स्वच्छ सुंदर व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीत स्वच्छता समितीचे सभापती रामचंद्र जाधव, भाजपचे गटनेते मनिष देहेरकर, संदिप पवार, शिवसेनेचे प्रकाश केणे, नगरसेवक, मुख्याधिकारी, कर्मचारी आणि सर्व क्षेत्रातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top