दिनांक 17 July 2019 वेळ 4:25 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » डहाणू येथे विराट हिंदू सम्मेलनाची जोरदार तयारी. डॉ. मोहन भागवत रहाणार उपस्थित

डहाणू येथे विराट हिंदू सम्मेलनाची जोरदार तयारी. डॉ. मोहन भागवत रहाणार उपस्थित

IMG-20180412-WA0100राजतंत्र न्यूज नेटवर्किंग 
            विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तलासरी वनवासी विद्यार्थी वसतीगृह प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाच्या निमीत्ताने डहाणूतील आसवे येथे विराट हिंदू सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले असून या सम्मेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित रहाणार असल्याने ते काय भूमिका मांडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे तर सम्मेलनासाठी हजारोंची उपस्थिती अपेक्षित असल्याने त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे.
           राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून आदिवासी भागात काम करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना करण्यात आली. त्या   माध्यमातून तलासरी येथे वनवासी कल्याण केंद्र  सुरू करण्यात आले. ह्या  वनवासी कल्याण केंद्राला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून संघाने डहाणू येथे विराट हिंदू सम्मेलन आयोजित केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक  संस्था – संघटना गेली अनेक दशके आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत  आहेत. त्याच प्रमाणे या परिसरात गेली शेकडो वर्षे संत – महंत, कीर्तनकार यांच्या धार्मिक नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या समाज जागरणाच्या कार्यास अधिक गती मिळावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत या विराट हिंदू सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
           रविवार दिनांक १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता होणाऱ्या सम्मेलनास सरसंघचालक व सुरत तरसाडा येथील साधना कुटीरचे स्वामी सवितानंद यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार असून कार्यक्रमासाठी स्वामी विश्वेश्वरानंद, महामंडलेश्वर मुंबई, स्वामी रघुनाथ महाराज ( देवबाप्पा )- त्र्यंबकेश्वर, स्वामी सदानंद महाराज – तुंगारेश्वर, वारकसंप्रदायाचे ह. भ. प. हरिश्चंद्र महाराज कुवरा, ह. भ. प. वसंत महाराज हिलीम आदी उपस्थित राहणार आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top