दिनांक 16 January 2019 वेळ 4:19 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाड्यात भंगार चोरांना अटक 

वाड्यात भंगार चोरांना अटक 

 

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
वाडा, दि. १२ : तालुक्यातील आबिटघर येथील सूर्या कंपनीतील भंगार चोरून घेवून जाणाऱ्या एका टोळीला वाडा पोलिसांनी वाडा –  आघई रस्त्यावरील जांभूळपाडा येथे रंगेहाथ पकडले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
        या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मंगळवारी ( दि. १० ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आबिटघर येथील सूर्या कंपनी अलायन्स प्रा.  लिमिटेड या कंपनीतील सूर्या व विस्तार कंपनीचे सुमारे १३ हजार २०० रुपये किंमतीचे  टी. एम. टी बार व सळई आदी मालाची चोरी केली आहे. हा चोरीचा माल घेऊन जात असताना उत्तम पाटील (वय २७ ) रा. भावेघर, मयूर गोतारणे ( वय २४ ) रा. सरसओहळ, बाळाराम जाधव ( वय २७ ) रा. खानिवली, सुभाष गवारी ( वय २० ) सरसओहळ मोईन भुरे ह्या पाच आरोपींना वाडा पोलिसांनी पकडले. ह्या आरोपींना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले. दरम्यान ह्या गुन्ह्यातील आरोपीमुळे तालुक्यात घडलेले अनेक चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे व्यक्त केली आहे .

comments

About Rajtantra

Scroll To Top