दिनांक 20 April 2018 वेळ 12:56 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल औसरकर यांचे निधन.

जव्हार नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल औसरकर यांचे निधन.

IMG-20180412-WA0299प्रतिनिधी
              जव्हार, दि. १२ : जव्हार- नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती अमोल औसरकर यांचे बुधवारी (दि. ११) पुणे येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे . औसरकर यांची दुःखाची बातमी समजताच शहरावर शोककळा पसरली. येथील  व्यापा-यांनी दुपारपर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
               अमोल औसरकर हे गेल्या काही महिन्यांपासुन किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यावरील उपचाराकरीता त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र  काल औसरकरांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांचे निधन झाले.
              औसरकर हे गेल्या १५ वर्षांपासून सलग तीनवेळा निवडून आलेले एकमेव नगरसेवक होते. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक निवडून आलेले नगरसेवक होते.  सध्या  ते बांधकाम सभापती म्हणून कार्यरत होते.  त्यांच्या अंत्ययात्रेसाठी शेकडो नागरिक उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top