डहाणू: १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर व्याख्यान

0
180
LOGO-4-Onlineडहाणू दि. १२: येत्या १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमीत्त दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांचे भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डहाणू शहरातील आंबेडकर नगर (मसोली) येथे सकाळी ११ वाजता हे व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे. 
                डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकर नगर मध्ये नेहमीच उत्साहात साजरी केली जाते.  मात्र या वर्षी प्रथमच या निमीत्ताने भारतीय राज्यघटनेवर व्याख्यान आयोजीत केले असून यातून मागासवर्गीय समाजाला संविधानाने दिलेले अधिकार समजावेत हा उद्देश आहे. लोकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक, तथा माजी नगरसेवक नगिन देवा यांनी केले आहे.
Print Friendly, PDF & Email

comments