दिनांक 21 January 2019 वेळ 5:47 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » निवृत्त हवालदार दत्तात्रय नाईक यांचा विषप्राशनाने आत्मत्याग करण्याचा इशारा  

निवृत्त हवालदार दत्तात्रय नाईक यांचा विषप्राशनाने आत्मत्याग करण्याचा इशारा  

_facebook_1523534055020राजतंत्र न्यूज नेटवर्क
            पालघर दि. १२: पालघरचे उप विभागीय पोलीस अधिकारी निमित गोयल यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करीत निवृत्त पोलीस हवालदार दत्तात्रय के. नाईक यांनी गोयल यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर दिनी मुंबईच्या आझाद मैदानावर विषप्राशन करुन आत्मत्याग करण्याचा इशारा देखील नाईक यांनी गृहसचिवांना दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
             नाईक यांनी पोलीस व्यवस्थेत २७ वर्षांची सेवा बजावल्यानंतर नियत वयोमानाच्या आधिच स्वेच्छानिवृत्ती स्विकारली होती. निवृत्तीनंतर ते पोलीस विभागातील विभागीय चौकश्यांमध्ये कसुरदार पोलीसांच्या वतीने बचाव प्रतिनिधी म्हणून सेवा देतात. विभागीय चौकशांमध्ये बचाव पक्षाला वकीलाची मदत घेता येत नाही, मात्र पोलीस सेवेतील कर्मचारी चौकशीकामी बचाव पक्षातर्फे अधिकृतपणे वकिलाची भूमिका पार पाडू शकतो. नाईक हे प्रभावी बचाव प्रतिनिधी म्हणून ओळखले जात असून त्यांचा या क्षेत्रात दबदबा तयार झाला आहे.
              ६ एप्रिल रोजी नाईक हे अशाच एका चौकशीकामी निमित गोयल यांच्या दालनात गेले असता गोयल यांनी शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणूक दिली व चौकशीचे काम नियमांनुसार चालवले नाही असा नाईक यांचा आरोप आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top