दिनांक 16 January 2019 वेळ 4:20 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणूत नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन

डहाणूत नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन

LOGO-4-Onlineप्रतिनिधी 
डहाणू, दि. १२ :  पतंजली योग समिती डहाणू आणि लायन्स क्लब ऑफ़ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १૪  ते १९ एप्रिल ૧૮ दरम्यान नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन जयंतीभाई दोषी यांच्या मैदानावर सदर कालावधीत  सकाळी ६ ते ७. ૩૦ वाजे पर्यंत असणार आहे.
        प्रा. उत्तम सहाणे यांनी शिबिरा विषयी माहिती देताना सांगितले की शिबिरामध्ये मुंबईच्या जेष्ठ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दैनंदिन जीवनात आपण बर्‍याच चुकीच्या सवायीं कडे दुर्लक्ष करतो आणि अनेक गंभीर आजार जवळ करत असतो त्यापैकीच स्थूलपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग या व अशा प्रकारचे इतर गंभीर आजार बरे होण्याचे दृष्टीने योग व औषधाद्वारे  योग्यते मार्गदर्शन शिबिरात होणार आहे. तरी शिबिरार्थीनीं १० मिनिटे आधी स्थानापन्न व्हावे व येताना पेन वही घेऊन यावे. समिती तर्फे लोकांना प्रत्यक्ष भेटून, माहिती पत्रके देऊन शिबिराची माहिती करून दिली जात आहे.           आपला थोडा अमूल्य  वेळ मौल्यवान आरोग्यासाठी देऊन डहाणू तील विशेषत: पूर्व भागातील नागरिकांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष राजूभाई पारेख यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top