दिनांक 19 May 2019 वेळ 10:06 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » नवापूर खाडी मासे मृत्यू प्रकरणी गठीत समितीकडून घटनास्थळाची पाहणी

नवापूर खाडी मासे मृत्यू प्रकरणी गठीत समितीकडून घटनास्थळाची पाहणी

IMG-20180411-WA0068वार्ताहर
            बोईसर, दि. ११: तारापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेल्या नवापूर खाडीत आठवडाभरात दोन वेळा मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. वारंवार अशा घटना घडत असताना संबंधित यंत्रणा कोणतीही कारवाई करीत नसल्याने येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि.९) प्रदूषित सांडपाण्यामुळे मृत पावलेले मासे प्रदूषित नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात व रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या कार्यालयामध्ये फेकून संताप व्यक्त केला होता. अखेर या घटनेची दखल घेत आला जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली असून आज या समितीनं ए घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या पाहणीदरम्यान समितीला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
              तारापूर एमआयडीसीतील अनेक कारखानदार कारखान्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी प्रक्रिया न करताच सार्वजनिक नाल्यात सोडत असल्याने हे हे सांडपाणी पुढे एमआयडीसीलागतच असलेल्या नवापूर खाडीत जाऊन मिसळते. त्यामुळे खाडी प्रदूषित होत असून रासायनिक सांडपाण्यामुळे मागील आठवड्याभरात दोन वेळा हजारो मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीही अनेकदा नवापूर, दांडी, सालवड खाडीतील मासे मृत पावल्याचे प्रकार घडले असल्याने खाडीतील जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या येथील मच्छिमार बांधवांमध्ये व्यवसाय उद्वस्थ होण्याची भीती असून अश्या घटना घडल्यानंतर संभंधित विभागाचे अधिकारी केवळ पाहणी करण्यापलीकडे कोणतीही कारवाई करीत नसल्याने सोमवारी नवापूर येथील ग्रामस्थांनी मृत पावलेले मासे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात व रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या कार्यालयात फेकून निषेध व यक्त केला.
या घटनेची दखल घेत एमआयडीसी, एमपीसीबी व जिल्हाधिकाऱ्यांनी फशरीज कार्यालय, तलाठी, सर्कल अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली असून या प;रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीने आज नवापूर खाडी परिसराला भेट देऊन नागपूरचे सरपंच व ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी आपला प्रखर विरोध दर्शविला. तर नागपूरचे सरपंच उदय मेहेर यांनी सालवड-शिवाजीनगर विभागातील कारखान्यांतून सोडले जाणारे सांडपाणी त्वरित बंद करावे, तसेच दोषी कारखान्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. तर याप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top