दिनांक 20 April 2018 वेळ 12:59 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » विम्याच्या रक्कमेवर उपाध्यक्षांचा  श्रेयासाठी अट्टाहास

विम्याच्या रक्कमेवर उपाध्यक्षांचा  श्रेयासाठी अट्टाहास

IMG_20180409_111151प्रतिनिधी

            वाडा, दि. ११ : दोन वर्षापूर्वी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे लोखंडी गेट कोसळून एक विद्यार्थीनी दगावली. त्या विद्यार्थीनीच्या कुटुंबाला राजीव गांधी विमा योजनेद्वारे  अपघात विम्याची रक्कमेचा धनादेश आला असताना पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधें यांनी केवळ श्रेयाकरिता ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असल्याचे भासवत स्वात:च्या हस्ते धनादेशाचे वाटप केले. मात्र दिलेला धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा नसून राजीव गांधी विमा योजनेअंतर्गत असल्याचे उघड झाल्याने  गंधेंचे पुरते हसे झाले आहे. 

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील काही विद्यार्थी दुपारी जेवणाच्या सुट्टीत शाळेच्या लोखंडी गेटवर झोके घेत खेळत होते. त्यावेळी खेळत असलेल्या तन्वी धानवा ह्या विद्यार्थीनीच्या अंगावर हे गेट कोसळून डोक्याला जबर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर शैलेश चव्हाण हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. ही घटना ५ डिसेंबर २०१६ रोजी घडली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेने मृत तन्वी धानवाच्या कुटुंबियांना केवळ २० हजार रुपयांची शासकीय मदत दिली होती. त्यानंतर आता दोन वर्षांनी राजीव गांधी विमा योजनेद्वारे ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गंधेंनी ही विम्याची रक्कम मिळाली असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे मदत मिळाली असल्याचे भासवत सोमवारी ( दि. ९ ) तन्वीच्या कुटुंबियांकडे हा धनादेश स्वात:च्या हस्ते सुपूर्द केला. त्यासंदर्भात विविध वृत्तपत्रांत बातम्याही प्रसिद्ध झाल्या.  मात्र आता हा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा नसून राजीव गांधी विमा योजनेचा असल्याचे उघड झाल्याने उपाध्यक्ष गंधेंची श्रेयासाठीची अहमहमिकाच सिध्द होत आहे.

सरकार शालेय विद्यार्थ्यांचा राजीव गांधी विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांकडे अपघात विमा उतरवत असते. राज्यातील शाळांमध्येअपघातामुळे घडलेल्या  दुर्दैवी घटनेनंतर विम्याच्या रक्कमेद्वारे अपघातग्रस्तांना अर्थसहाय्य  केले जाते. ह्याच योजनेद्वारे तन्वीच्या कुटुंबियांसह जखमी विद्यार्थी शैलेश चव्हाण ह्याला ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top