दिनांक 23 July 2018 वेळ 3:15 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा शहरात एका रात्रीत सात दुकाने फोडली; व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

वाडा शहरात एका रात्रीत सात दुकाने फोडली; व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

IMG-20180411-WA0001प्रतिनिधी
वाडा, दि. ११: शहरातील खंडेश्वरी नाका येथील व टी.डी.सी बँक च्या खाली असलेली तब्बल सात दुकाने आज पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान चोरट्यांनी फोडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. दरम्यान ह्या घटनेचा तातडीने तपास लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, तालुक्यात मागील अनेक चोऱ्यांचा तपास गुलदस्त्यात असताना आज पहाटे एकाचवेळी सात दुकाने फोडल्याने स्थानिक पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
               खंडेश्वरी नाका येथे आज पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकाने फोडली त्यात श्री साईकृपा डिस्ट्रीब्युटर्स एजन्सी, श्री समर्थ इन्वर्टर , मातोश्री मेडिकल ,ऑनलाईन लॉटरी सेंटर , प्यारेजी किराणा ,दिगंबर मोबाईल सेंटर व एक आईस्क्रीम चे दुकान अशी एकूण सात दुकाने चोरट्यांनी फोडून किरकोळ रोख रक्कम लंपास करण्यात ते यशस्वी झाले.  मात्र हा सर्व प्रकार सी.सी.टी.व्ही मध्ये कैद झाला असून पोलिसांना पुढील तपासासाठी सोयीस्कर झाले असून वाडा पोलिस आता किती तपास करतात ह्याकडे व्यापारी व नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top