दिनांक 16 January 2019 वेळ 4:11 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » तलाठ्यांच्या अनुपस्थितीचा शेतकर्‍यांना फटका

तलाठ्यांच्या अनुपस्थितीचा शेतकर्‍यांना फटका

राजतंत्र न्यूज नेटवर्क/अशोक पाटील :

कुडूस, दि. 11 : शेतकरी बांधवांसाठी एप्रिल महिना महत्वाचा असतो. या काळात शेतीविषयक अनेक कामांसाठी तलाठी दाखले महत्वाचे असतात. मात्र येथील तलाठ्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे दाखले मिळण्यास विलंब होत असुन याचा फटका शेकर्‍यांना बसत आहे.
एप्रिल महिन्यात शेतकरी बांधव सहकारी संस्थाकडून पिक कर्ज घेतो, त्यासाठी आवश्यक असणारे दाखले, मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे दाखले, डिक्लरेशन व सात बारा बोजा कमी केल्याचा दाखला, या शिवाय अन्य कामांसाठी शेतकर्‍यांना तलाठी दाखले हवे असतात. मात्र येथील तलाठी कधी वाडा तालुका कार्यालयात, कधी प्रांत कार्यालयात, तर कधी पालघर जिल्हा कार्यालयात गेले असल्याची कारणे पुढे करून सजेतील कार्यालय बंद ठेवीत असल्याने शेतकरी बांधवांना दाखल्यांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. यात वेळ व पैशांचा अपव्यय तर होतोच, त्यात शेती विषयक व शैक्षणिक कामात खोळंबा झाल्याने शेतकरी व नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
यावर खंत व्यक्त करून शेतकरी बांधवांनी तलाठी महत्वाची कामे करण्यासाठी कार्यालयात यावेत असे आदेश तहसीलदार व प्रांत अधिकार्‍यांनी द्यावेत, अशी मागणी केली आहे. याबाबतचे शेतकर्‍यांच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनंजय पष्टे यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top