दिनांक 16 January 2019 वेळ 3:15 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले धर्मादाय दवाखान्याचे उद्घाटन

वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले धर्मादाय दवाखान्याचे उद्घाटन

WADA DHARMDAY HOSPITALराजतंत्र न्यूज नेटवर्क/वैभव पालवे  :
वाडा, दि. ११:  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने येथील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या द्रोणा फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिब जनतेला अत्यल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून बुधवार दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले धर्मादाय दवाखान्याचे उद्घाटन उपनगराध्यक्षा ऊर्मिला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
          द्रोणा फाउंडेशन वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून वाडा, अंबाडी व भिवंडी येथे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारली आहेत. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना माफक दरात चांगली आरोग्य सेवा दिली जात असून समाजातील अत्यंत दुर्बल घटकालाही अत्यल्प दरात आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने द्रोणा फाउंडेशनने महात्मा ज्योतिबा फुले धर्मादाय दवाखाना येथील मुख्य बाजारपेठेत रोठे कॉंप्लेक्स येथे सुरू केला आहे. या दवाखान्यात अवघ्या दहा रुपयांत सर्वसाधारण आजारांची तपासणी करून औषधोपचार केला जाणार आहे.
              यावेळी या उपक्रमाविषयी माहिती देतांना द्रोणा फाउंडेशनचे डॉ. नितीन मोकाशी म्हणाले कि, सद्यस्थितीत वैद्यकीय उपचार घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे बनले आहे. गोरगरीब जनता साध्या साध्या आजारासाठीचेही उपचार घेऊ शकत नाहीत. यावर उपाय म्हणून अत्यल्प दरात ही वैद्यकीय सेवा सुरू केली असून बहुजन समाज ज्या महापुरुषांच्या कर्तृत्वामुळे आज उभा आहे, त्यांचे समाजाला विस्मरण होऊ नये म्हणून महात्मा फुलेंच्या नावे हा दवाखाना सुरू करून त्यांच्या सामाजिक कार्याला मानवंदना देण्याचा हा अल्पसा प्रयत्न असल्याचे डॉ. मोकाशी म्हणाले.
            या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका वर्षा गोळे, सुचिता पाटील, अंजनी पाटील, रिमा गंधे, पत्रकार वैभव पालवे, दिनेश यादव, सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते ए. टी. पवार, दत्तात्रेय पटारे आदी उपस्थित होते. दरम्यान अत्यल्प दरात ही सुविधा सुरू करण्यात आली असून ग्रामीण भागातील अधिकाधिक रुग्णांनी या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन द्रोणा फाउंडेशनच्या डॉ. माधूरी कांबळे यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top