दिनांक 16 January 2019 वेळ 4:19 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » सामाजिक समता सप्ताह निमित्ताने पालघर येथे रक्तदान शिबीर संपन्न

सामाजिक समता सप्ताह निमित्ताने पालघर येथे रक्तदान शिबीर संपन्न

Rajtantra_EPAPER_110418_1_090447राजतंत्र न्यु नेटवर्क
पालघर, दि.१० : ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान देशभरात भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत असून या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पालघर समाज कल्याण विभागाचे सहाय्य्क आयुक्त व पालघर ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दि. १० एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून शिबिराचे उदघाटन केले. प्रास्ताविक सहाय्य्क आयुक्त योगेश पाटील यांनी केले. शिबिरास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर गावीत, स्त्रिरोगतज्ञ् डॉ. राजेंद्र चव्हाण, राजेश गायकवाड, भाऊराव तायडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, या शिबिरास मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भाग घेतला होता.

comments

About Rajtantra

Scroll To Top