दिनांक 21 July 2019 वेळ 5:24 AM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » कुडूसमधील डायबिटीस रुग्णांना दिलासा, चाचणीसाठी ऑटो एनालिसिस उपकरण झाले उपलब्ध

कुडूसमधील डायबिटीस रुग्णांना दिलासा, चाचणीसाठी ऑटो एनालिसिस उपकरण झाले उपलब्ध

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
कुडूस, दि. १०: भाजपचे स्थानिक कार्यकर्ते ओमप्रकाश शर्मा यांनी डायबिटीस केअर सेंटरसाठी ऑटोअॅनालिसीस उपकरण उपलब्ध करून दिल्याने परिसरातील डायाबिटीस रूग्णांना दिलासा मिळाला आहे. 
          तालुक्यातील खुपरी येथे राहणारे शर्मा  त्यांच्या कार्यालयात रूग्णसेवा म्हणून दर रविवारी येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात येते.  डायाबिटीस रूग्णांना अल्पखर्चात डायबिटिसची चाचणी करता यावी याकरिता शर्मा यांनी येथील डायबिटीस केअर सेंटरसाठी ऑटोअॅनालिसीस उपकरण उपलब्ध करून दिल्याने परिसरातील डायाबिटीस रूग्णांना दिलासा मिळाला आहे. शर्मा हे गेली चाळीस वर्षे तालुक्यातील विकासासाठी काम करीत असून आजवर दुर्लक्षित असलेले तालुक्यातील अनेक प्रश्न त्यांनी सोडविले आहेत.
           ८ एप्रिल रोजी खुपरी येथे झालेल्या कार्यक्रमासाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबजी काठोले, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती धनश्री चौधरी, वाडा सभापती अश्विनी शेळके, उपसभापती जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकरराव पाटील व ईरफानभाई सुसे हे उपस्थित होते

comments

About Rajtantra

Scroll To Top