दिनांक 16 January 2019 वेळ 3:27 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » तरुणाकडून बस चोरीचा प्रयत्न

तरुणाकडून बस चोरीचा प्रयत्न

Rajtantra_EPAPER_110418_1_090415वार्ताहर 
         बोईसर, दि.१० :  एका माथेफिरूने आज बोईसर येथील एसटी डेपोमध्ये उभी असलेली   बस पळवून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
सुदैवाने बस झाडावर आदळून नाल्यात अडकल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर माथेफिरुला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
            आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान एम. एच. २०/बी.सी. ०४०६ या क्रमांकाच्या बोईसर पालघर बसचा चालक अमोलसिंह राजपूत बसची नोंदणी करण्यासाठी बोईसर डेपोच्या कंट्रोल रूममध्ये गेला असता अचानक साबीर अली मन्सूर या ३१ वर्षीय तरुणाने बसचा ताबा घेतला व डेपोतून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बस चालवता येत नसल्याने थोड्याच अंतरावर त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व बस डेपोच्या आवारातील झाडावर आदळून नाल्यात अडकून बसली. या प्रकार तेथे उपस्थित असलेल्या बस चालक, कर्मचारी, प्रवासी, व नागरिकांच्या लक्षात येताच सर्वानी त्वरित धाव घेऊन मन्सुरील पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बोईसर डेपो परिसरात व डेपोसमोर असलेल्या मुख्य रस्त्यावर सकाळच्या सुमारास पादचाऱ्यांसह वाहनांची मोथयुं प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे सुदैवाने बस नाल्यात अडकल्याने व बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टाळला आहे.
दरम्यान, मन्सुरी याच्या विरोधात बोईसर पोलीस क्सस्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून माझ्या उत्तर प्रदेश येथील गावावरून माणसे आणावयाची असल्याने मी बस घेऊन जात होतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे मन्सूर मनोरुग्ण असावा, असा प्रार्थमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top