दिनांक 16 January 2019 वेळ 4:07 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा : शाळा अपघातातील मृत तन्वी व जखमी शैलेशच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत.

वाडा : शाळा अपघातातील मृत तन्वी व जखमी शैलेशच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत.

Rajtantra_EPAPER_100418_1_080421प्रतिनिधी
          वाडा, दि. ०९ : दिनांक ५ डिसेंबर २०१६ मध्ये वाडा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील लोखंडी गेट अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कुमारी तन्वी धानवा हिच्या कुटुंबियांना व याच दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या कुमार शैलेश चव्हाण याला मुख्यमंत्री सहायता निधीतून अनुक्रमे रुपये ७५,०००  व रुपये ३०,००० ची आर्थिक मदत प्रशासनातर्फे पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती निलेश गंधे व महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सुपूर्द करण्यात आली. यावेळी वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, वाड्याच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, उपनगराध्यक्षा उर्मिला पाटील, जिल्हा परिषद सदस्या भारती कामडी, कीर्ती हावरे, पंचायत समिती सदस्य अरुण अधिकारी, नगरसेविका वर्षा गोळे, गट शिक्षणाधिकारी ( प्रभारी ) ज्ञानेश्वर निपुर्ते, जि. प. शाळा मुख्याध्यापक सुनील मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
  हि मदत मिळवून देण्यासाठी जि.प. नियोजन समिती सदस्या ज्योतीताई ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले

comments

About Rajtantra

Scroll To Top