दिनांक 16 January 2019 वेळ 3:13 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » प्लास्टिक पिशवी, थर्माकोलचा कुडूसमध्ये मुक्त वापर. 

प्लास्टिक पिशवी, थर्माकोलचा कुडूसमध्ये मुक्त वापर. 

Rajtantra_EPAPER_100418_1_070439प्रतिनिधी
कुडूस, दि. ०९: प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट बाळगून राज्य सरकारने या वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करण्यास राज्यात संपूर्ण बंदी केली असतांना कुडूस मध्ये मात्र खुलेआम विक्री व व्यापारी व ग्राहकात देवघेव सुरू आहे. 
              कुडूस येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलेही पाऊल या प्लास्टिक बंदी बाबत उचलेले नाही. अथवा एका फुलविक्रेत्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यापा-याने स्वयंप्रेरणेने प्लास्टिकच्या पिशव्यांचा अथवा प्लास्टिकच्या वस्तू न विकण्याचा सकल्प केलेला दिसत नाही. प्लास्टिक बंदी बाबत कुठेही बोर्ड नाही अथवा सूचना फलक नाही. या मुळे गल्ली बोळात व रस्त्याच्या दुतर्फा प्लास्टिक पिशवीतून फेकलेला कचरा नजरेस पडतो.
             कुडूसमधील गटारे प्लास्टिकच्या पिशव्यांच्या कच-यांनी भरलेली दिसतात. पिशव्या मुळेच गटारातील पाणी पुढे जात नाही. परिणामी डास, दुर्गंधी मुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. वाढती लोकसंख्या व वाढणारी नगरे लक्षात घेवून कुडूस प्रमाणेच चिंचघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हे गांभीर्य लक्षात घेवून प्लास्टिक बंदी बाबत कठोर पाऊल उचलेले पाहिजे. कच-याचे ठिग वेळीच ऊचलून स्वच्छता राखली पाहिजे. स्वच्छता करणे हे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील काम असले तरी व्यापा-यांनी प्लास्टिक बंदी बाबत गांभीर्याने सहकार्य केले व नागरिकांनी नियम पाळले तरच स्वच्छ कुडूस सुंदर कुडूस शक्य आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top