दिनांक 16 January 2019 वेळ 4:16 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » चिमुकल्यासाठी डॉक्टर बनले देवदूत ! ओंकारवरील हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी

चिमुकल्यासाठी डॉक्टर बनले देवदूत ! ओंकारवरील हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी

Rajtantra_EPAPER_090418_4_070443प्रतिनिधी
वाडा, दि. ८ :  तालुक्यातील कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या कुयलू या गावातील एका गरीब कुटुंबातील चिमुकल्या ओंकार गायकवाड याच्या हृदयाला छिद्र होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास त्याला होत होता. एका शिबिरात हा आजार निष्पन्न झाल्याने वाडा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ठाण्याच्या ज्युपिटर या नामांकित रूग्णालयात दाखल करून त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने ओंकारचे हृदय आता पुन्हा जोमाने धडधडू लागले.  
             वाडा तालुक्यातील कुयलू हे एक छोटेसे  खेडेगाव. या गावात विनोद गायकवाड हा इसम  आपल्या कुटूंबासह राहतो. घरची परिस्थिती अगदी  बेताचीच त्यामुळे मोलमजुरी करून आपल्या  कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. सध्या विटभट्टीवर तो  काम करत आहे. चिमुकला ओंकार हा २ वर्षे १० महिन्याचा असून त्याला हृदयाचा आजार होता. त्याच्या हृदयाला मोठे छिद्र असल्याने त्याला नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागत असे. विनोदने त्याला मानव विकासच्या एका शिबिरामध्ये त्याला तपासणीसाठी नेले असता डाॅ. विनय पाटील, डाॅ. जितेंद्र पाटील यांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या हदयाला मोठे छिद्र असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
           त्यानंतर डॉ. विनय पाटील व आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. भस्मे, डाॅ. मिनल पाटील व कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांच्या सहकार्याने ओंकार याला ठाणे येथील ज्युपीटर या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याची तपासणी करून त्याच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ओंकारचे ह्रदय पुन्हा जोमाने धडधडू लागले आहे.
          शासनाच्या जीवनदायी आरोग्य योजनेतून ओंकारवर ही मोफत शस्त्रक्रिया झाली आहे. ओंकारच्या आईवडिलांनी डॉ. विनय पाटील व  वाडा आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांचे विशेष आभार मानले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top