दिनांक 09 December 2019 वेळ 11:30 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू: सरावली तपासणी नाक्याजवळील नाल्यात रासायन मिश्रीत प्रदूषित सांडपाण्याचा पूर

डहाणू: सरावली तपासणी नाक्याजवळील नाल्यात रासायन मिश्रीत प्रदूषित सांडपाण्याचा पूर

राजतंत्र न्यूज नेटवर्क
डहाणू दि. ८: डहाणू तालुका पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असताना शहरातील सरावली येथील पोलीस तपासणी नाक्याजवळील नाल्यातून खुले आमपणे रसायन मिश्रीत प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याचे उघड झाले आहे. यातून डहाणू तालुक्याच्या पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेले माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे अपयश समोर आले आहे. पर्यावरणप्रेमाचा बोगस देखावा करुन सर्वसामान्यांची मस्ती करणारी तथाकथित पर्यावरणवादी मंडळी देखील उघडी पडली आहे. जवळपासच्या कारखान्यांतून या नाल्यात सांडपाणी सोडले जाते व तेथून हे प्रदूषित पाणी खाजण जमिनी प्रदूषित करत करत समुद्रात सामिल होत आहे. अशा कारखान्यांवर त्वरित कडक कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top