दिनांक 16 January 2019 वेळ 3:58 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » कोसबाड: विकासवाडीचा माजी विद्यार्थी लक्ष्मण माच्छी बनला इंग्रजीचा तज्ज्ञ प्रशिक्षक

कोसबाड: विकासवाडीचा माजी विद्यार्थी लक्ष्मण माच्छी बनला इंग्रजीचा तज्ज्ञ प्रशिक्षक

LAXMAN MACCHI1

LAXMAN MACCHI

लक्ष्मण माच्छी

राजतंत्र न्यूज नेटवर्क
तलासरी, दि. ८: गिरगाव माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी भाषा विषयाचे तज्ज्ञ शिक्षक लक्ष्मण शंभू माच्छी यांना राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभिनयांतर्गत जिल्हा शिक्षण विभागाकडून उत्कृष्ट चेस ( chess ) प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचे चेस तज्ज्ञ ठरल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
लक्ष्मण हे डहाणूतील वडकून येथे रहाणारे असून त्यांनी डहाणू तालुक्यातील कोसबाडच्या टेकडीवरील पद्मभूषण ताराबाई मोडक विद्यानगरीतील विकासवाडी अध्यापक विद्यालयातून डि. एड. ची पदविका प्राप्त केली. त्यानंतर यशवंतराव मुक्त विद्यापीठातून कला शाखेतून पदवी व पुढे पुणे विद्यापिठातून पदव्यूत्तर शिक्षण घेतले. आता ते पुन्हा एम. ए. करीत आहेत.
पालघर जिल्ह्यातून कन्टीन्यू हेल्प टू टीचर्स ऑफ इंग्लिश फ्रॉम सेकंडरी स्कुल ( chess ) या उपक्रमात वेगवेगळ्या शाळांतील इंग्रजी विषय तज्ज्ञ शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आले. त्यामध्ये लक्ष्मण माच्छी यांनी प्रशिक्षक म्हणून महत्वाचे मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषा विषयाचे सर्वात कमी वयाचे प्रशिक्षक असूनही त्यांनी उत्तम मार्गदर्शकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा जिल्हा शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) राजेश कंकाळ व प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याविषयी जिल्हा समन्वयक राहुल गिरी देखील उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top