दिनांक 16 January 2019 वेळ 3:12 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाड्यात गावदेवीचा बोहाडा उत्साहात संपन्न 

वाड्यात गावदेवीचा बोहाडा उत्साहात संपन्न 

IMG_20180405_234437प्रतिनिधी
वाडा,दि. ६: गावातील गावदेवी मंदिर समितीच्या वतीने गुरुवार दिनांक ५ मार्च ते ६ मार्च रोजी ‘बोहाडा’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कित्येक वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा वाड्यातील गावदेवीचा जत्रोत्सव ‘बोहाडा’ म्हणून ओळखला जातो. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात लहान मुलांपासून आबालवृद्ध सर्व मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी होत असतात.
           गावाची रक्षणकर्ती देवी म्हणून ख्याती असलेली गावदेवी. गावातील प्रत्येकजण घरातील कोणत्याही शुभकार्या प्रसंगी या देवीच्या दर्शनाने आपल्या कार्याची सुरुवात करून कार्यात कोणत्याही प्रकारचे अरिष्ट येवू नये व गावावरील सर्व संकटांपासून रक्षण करण्यासाठी गावदेवीची प्रार्थना करीत असतात. गावदेवी मंदिर व उत्सव समितीचे अनंता पाटील, राजेंद्र पाटील व राजेन्द्र समेळ यांच्यासह अनेक सहकारी उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेत असतात.
        मुखवट्यांचे नृत्यनाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे ‘बोहाडा’ हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रात्री या उत्सवाला सुरुवात होते. निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून आदिवासींचे पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते. सकाळ पर्यंत चालणाऱ्या या मिरवणुकीत विविध देवीदेवतांचे गणपती, सरस्वती, मच्छ-राक्षस, मारुती-जंबुमाळी, त्रिपुरासूर-शंकर, त्राटिका-राम लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, आदी अनेक देवीदेवतांचे मुखवटे परिधान करून मिरवणूक काढली जाते. विविध प्रकारची दुकाने या बोहाड्यात सजवली जातात.

comments

About Rajtantra

Scroll To Top