दिनांक 16 August 2018 वेळ 2:53 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » खैराफाटक ग्रामपंचयतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे विवेक वडे 

खैराफाटक ग्रामपंचयतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे विवेक वडे 

IMG-20180405-WA0016प्रतिनिधी
बोईसर, दि. ५ :  पालघर तालुक्यातील खैराफाटक ग्रामपंचयतीच्या उपसरपंचपदाच्या  गुरुवारी ( दि. ५ ) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विवेक वडे हे   बिनविरोध निवडून आल्याने ह्या ग्रामपंचायतीव शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. 
           खैरापाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आदिवासींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या भूमिसेना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर युती करत  विकास आघाडी पॅनल अंतर्गत निवडणूक लढविली होती. यावेळी सरपंचपदाकरिता थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीमध्ये  विकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून भूमिसेनेच्या भावना धोडी ह्या सरपंचपदी मोठ्या मताधिक्याने निवडून  आल्या. तर सदस्यांमधून निवडायच्या उपसरपंचपदाची निवडूक आज घेण्यात आली. यावेळी  वडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
            उपसरपंचपदी  वडे यांच्या बिनविरोध निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी सहसंपर्कप्रमुख केतन पाटील,जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण . पालघर विधान सभाक्षेत्र प्रमुख वैभव संखे ,  तालुका प्रमुख निलम  संखे,  बोईसरचे  शहर प्रमुख मुकेश पाटील,विभाग प्रमुख कल्पेश पिंपळे, आरमण ईरानी,भूमी सेनेचे विकी शुक्ला, बेटेगाव उपसरपंच संज्योत  घरत, युवा सेनेचे मनोज संखे यांच्यासह मोठ्यासंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top