दिनांक 16 January 2019 वेळ 4:00 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनसेच्या प्राची संखे शिवसेनेत 

मनसेच्या प्राची संखे शिवसेनेत 

IMG-20180405-WA0019प्रतिनिधी
 बोईसर, दि. ५ : पालघर तालुक्यातील मनसेच्या सक्रिय कार्यकर्त्या व कुंभवली ग्रामपंचयतीच्या सदस्या प्राची प्रल्हाद संखे यांनी आपल्या  शेकडो कार्यकर्त्यांसह  गुरुवारी ( दि. ५ ) जिल्हा संपर्क महिला संघटक ममता चेंबूरकर यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत  प्रवेश केला. 
         कुंभवली ग्रामपंचयत ही तारापूर एमआयडीसी लगत असलेली राजकीयदृष्ट्या  महत्वपुर्ण ग्रामपंचायत आहे. ह्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी  प्राची संखे ह्या मनसेच्या माध्यमातून निवडून आल्या होत्या. तालुक्यात मनसेच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत असताना पक्षाच्या वाढीला येणाऱ्या मर्यादा लक्षात घेत त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासोबत असंख्य महिलांसह अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याने ह्या परिसरात शिवसेनेचे बळ वाढण्यास मदत आशी चर्चा आहे
             याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  राजेश शहा,  जिल्हा महिला संघटक  ज्योती मेहेर , उपजिल्हा प्रमुख राजेश कुट्टे , तालुकाप्रमुख सुधीर तमोरे , तालुका महिला संघटक  नीलम म्हात्रे ,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील , पालघर तालुका विधान सभा क्षेत्रप्रमुख श्वेता देसले , पंचयत समिती सदस्य सुशील चुरी , स्मिता पाटील , जयमाला चुरी आदी पदाधिकारी  उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top