दिनांक 16 January 2019 वेळ 3:28 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » बोईसर : इमारतीतील असुविधांविरोधात आमरण उपोषण

बोईसर : इमारतीतील असुविधांविरोधात आमरण उपोषण

Rajtantra_EPAPER_050418_4_050404वार्ताहर 
         बोईसर, दि. ०४ : बोईसर जवळील मान-वारांगडे  येथील श्याम सागर डेव्हलपर व के. के. डेव्हलपर या बांधकाम व्यावसायिकाकडून उभारण्यात आलेल्या स्प्रिंग फिल्ड प्रोजेकट बिल्डींगमध्ये पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सुविधा उपलब्ध न करून दिल्याने याविरोधात येथील रहिवाशांनी आजपासून आमरण उपोषण सुरु केले
            बोईसर पूर्वेतील मान- वरगंडेत भागात मोठ्या प्रमाणात गृह संकुले निर्माण होत आहेत. या परिसरात महावीर इम्परियर, टाटा, वंडर स्मॉल सिटी, ओस्तवाल इम्परियर, महिंद्रा यासारखे मोठे- मोठे प्रोजेकट उपलबध असून तारापूर औदयोगिक परिसरातील कामगार या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. येथे श्यामसागर डेव्हलपर व के. के. डेव्हलपर या बांधकाम व्यावसायिकाकडून देखील स्प्रिंग फिल्ड कॉम्प्लेक्स नामक गृह संकुल उभारण्यात आले असुन या संकुलनातील ३ व ४ क्रमांकाच्या इमारतीत मागील ५ वर्षांपासून रहिवाशांनी राहण्यास सुरुवात केली आहे. या बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाए नोंदणीच्या वेळेस ठराविक अवधीत इमारतीचे काम पूर्ण करण्याचे व सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ५ वर्ष उलटूनही पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सुविधा उपलब्ध करून न दिल्याची ओरड येथील रहिवाश्याची आहे. याबात अनेकवेळा तक्रारी करूनहि दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर रहिवाश्यानी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातील पत्र देऊन आमरण उपोषण सुरु केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top