मनोर : अवैध रेतीवाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई, तीन लाखांचा दंड वसूल

0
663
LOGO 4 Onlineप्रतिनिधी
मनोर, दि. ०४
मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या मनोर जवळील आवढाणी गावच्या हद्दीत मुंबई मार्गिकेवर अवैद्यरित्या बंद कंटेनर मध्ये गुजरातच्या रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मनोरच्या महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी कारवाई करीत तीन लाखांचा दंड वसूल केला.
         मनोरच्या मंडळ अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आवढाणी गावच्या हद्दीत महामार्गाच्या सर्व्हिस रोड वर उभ्या असलेल्या दोन कंटेनर वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये रेती असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याने वाहनामधील रेतीचे मोजमाप करून प्रत्येकी दीड लाख रुपयांचा दंड आकारणी करून तीन लाख रुपये वसूल करण्यात आले.
      आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रेतीमाफियांवर मनोर परिसरात मोठी कारवाई झाल्याने रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे. मनोरचे मंडळ अधिकारी वसंत बारवे आणि तलाठी नितीन सुर्वे यांनी ही कारवाई केली
Print Friendly, PDF & Email

comments