दिनांक 23 July 2018 वेळ 3:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » रस्त्याच्या कामामुळे वाहतूक सेवा ठप्प , ऐन परीक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची गैरसोय.

रस्त्याच्या कामामुळे वाहतूक सेवा ठप्प , ऐन परीक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची गैरसोय.

Rajtantra_EPAPER_050418_1_050428प्रतिनिधी 
जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील कोरतड ते लहान मेढा  रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू करण्यात आल्याने जव्हारहून देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा, आणि ओझरकडे येणारी एसटी बस सेवाअचानक बंद करण्यात आल्याने ऐन परिक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे. 
           जव्हार एसटी डेपोच्या देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा आणि ओझर या मार्गावरील बसेसमधून लहान मेढा, मोठा मेढा, पेरणआंबा, भागडा, कुंडाचापाडा, या भागातील शेकडो  कॉजलचे विद्यार्थी व शाळकरी मुले जव्हार ज्युनिअर कॉलेज आणि देहेरे आश्रम शाळेत ये-जा करीत आहेत. मात्र सावरपाडा ते लहान मेढा गावापर्यंत जिल्हा परिषदेने रस्त्याचे काम सुरु केले असून, रस्त्यावर खड्डी टाकून ठेवली आहे. तसेच रस्त्याचे काम चालू करतांना पर्यायी रस्त्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात या मार्गावरील एसटीबस सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
परिणामी या परिसरातील विद्यार्थी व प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहेत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना १० किमी अंतर पायी चालून  दसकोड बस गाठावीलागत आहे.
           जिल्हा परिषद बांधकाम विभागाने येथील नागरिकांना काहीच पूर्व सूचना न देता रस्त्याचे काम चालू केले आहे. त्यात कुठलाही पर्यायी रस्ता ठेवण्यात आलेला नाही. ठेकेदाराने संपूर्ण रस्ता खोदून टाकल्याने या रस्त्याने कुठलेही खाजगी वाहन किंवा महामंडळाची बससेवा जात नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाश्यांचे हाल झाले आहेत. रस्त्याचे कामदेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल होत असुन रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अथवा पर्यायी मार्गाची सोया करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top