दिनांक 24 October 2018 वेळ 3:39 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » जव्हार : आदिवासी शेतकऱ्याची  कर्जाला कंटाळून केली आत्महत्या.

जव्हार : आदिवासी शेतकऱ्याची  कर्जाला कंटाळून केली आत्महत्या.

Rajtantra_EPAPER_050418_1_050412प्रतिनिधी 
जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील हातेरी येथील धनजी विका जंगली (वय ६०) याच्यावर कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे या नैराश्यातून हातेरी गावातील त्यांच्या शेतात बुधवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. 
           जंगली याने मागील वर्षी ठाणे बँक शाखा यांच्या शेतकरी सोसायटी मधून ४२ हजार २०७ रूपये कर्ज घेतला होते. मात्र मागील वर्षी भाजीपाल्याचे पिक चांगले न आल्यामुळे व भाजीपाला लागवडीला रोग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले होत. अशा परिस्थितीत कर्ज फेडता येत नसताना दिवसेंदिवस त्यावरील व्याज वाढतच चालले होते. विशेष म्हणजे शासनाच्या पीक कर्ज माफीचा अर्जही त्यांनी भरला होता. इतर शेतकरांचे कर्ज माफ होत असतांना केवळ आपले कर्ज माफ झाले नाही. या नैराश्यातून जंगली यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या मुलांनी सांगितले. जंगली यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व नातवंड असा परिवार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top