दिनांक 16 January 2019 वेळ 4:23 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ६ एप्रिल रोजी मुंबईमध्ये अमित शहांची सभा, पालघर जिल्ह्यातून २० हजार कार्यकर्ते जाणार

६ एप्रिल रोजी मुंबईमध्ये अमित शहांची सभा, पालघर जिल्ह्यातून २० हजार कार्यकर्ते जाणार

AMIT SHAH DAURA
राजतंत्र न्यूज नेटवर्क : पालघर, दि. ४: येत्या शुक्रवारी मुंबईतील बांदा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा होणार असून या सभेद्वारे ते पक्षाच्या लाखो सक्रिय कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. पालघर जिल्ह्यातून या सभेसाठी जवळपास २५ हजार कार्यकर्ते जाणार अशी अपेक्षा असून त्यातील २० हजार कार्यकर्ते पालघर ग्रामीण जिल्ह्यातून जातील अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ व जिल्हा मिडीया सेलचे अध्यक्ष पुंडलिक भानुशाली उपस्थित होते.
या सभेत भाजपच्या बूथ प्रतिनिधींना सहभागी केला जाणार असून ही आगामी निवडणूकीची तयारी मानली जाते. सभेसाठी भाजपने जय्यत तयारी केली असून तेथे स्वच्छता व नियोजन राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते सज्ज रहाणार असल्याची माहिती अवधूत वाघ यांनी दिली. भाजप हा माध्यमांशी आकस बाळगणारा पक्ष नसून फेक न्यूजचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वांचे एकमत व्हावे अशी भाजपची भूमिका आहे. त्यासाठी माध्यमांची कुठल्याही पद्धतीची गळचेपी करण्याचे पक्षाचे धोरण नसल्याचा निर्वाळा देखील वाघ यांनी यावेळी बोलताना दिला.
पालघर जिल्ह्यातील सुर्या धरणाचे पाणी सिंचनासाठी राखीव असताना ते महानगर क्षेत्राकडे वळविण्याच्या शासनाच्या धोरणाबद्दल बोलताना स्थानिकांच्या भावनेशी सहमत असल्याची ग्वाही मंत्री सवरा यांनी दिली. याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे वस्तुस्थिती मांडली जाईल असेही सवरा म्हणाले.

comments

About Rajtantra

Scroll To Top