दिनांक 16 January 2019 वेळ 3:14 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » प्लास्टिक पिशवी बंद उपक्रम राबविणारे एकमेव कुडूसचे फुलविक्रेते. 

प्लास्टिक पिशवी बंद उपक्रम राबविणारे एकमेव कुडूसचे फुलविक्रेते. 

 Rajtantra_EPAPER_040418_1_090418प्रतिनिधी
कुडूस, दि. ०३: महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी हा निर्णय जाहिर केल्यानंतर कुडूस मधील एकमेव व्यापा-याने स्वयंप्रेरणेने प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद करून रद्दी पेपरात फुले व हार बांधून देण्यास सुरवात केली आहे.
            येथील काही व्यापा-यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, प्लास्टिकच्या पिशव्या बनविण्याचे कारखानेच सरकारने बंद करून कागदी पिशव्या पुरविल्या तर प्लास्टीक वापरावर बंदी शक्य होईल. कुठलीही वस्तू घेताना गि-हाईक पिशवीत द्या म्हणतात. मग आम्हाला प्लास्टिकच्या पिशवीशिवाय पर्याय नाही असे सांगण्यात आले. तर शासनाचा कोणताही निर्णय ठोस नसल्याने, व्यापा-यांना अशा घोषणा विषयी भिती वाटत नाही.
केलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी लगेच अंमलात आणली तरच जरब बसते. व अंमलबजावणी ख-या अर्थाने होते .अन्यथा कोर्टबाजीचे फाटे फुटतात व योजना बारगळते. हा अनुभव कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाला.
           फुलविक्रेते नामदेव त्रिंबक पाटील यांनी मात्र शासनाच्या स्तुत्य उपक्रमाला दाद देवून  इतर व्यापा-यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे

comments

About Rajtantra

Scroll To Top