दिनांक 16 January 2019 वेळ 4:11 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » सुर्या पाणी बचाव संघर्ष समितीने घेतली राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट 

सुर्या पाणी बचाव संघर्ष समितीने घेतली राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट 

Rajtantra_EPAPER_040418_1_090427राजतंत्र न्युज नेटवर्क  

पालघर, दि. ३: सुर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी आज राज्याचे राज्यपाल श्री विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सुर्या पाण्याचा प्रश्न सविस्तर पणे मांडला. या चर्चेमध्ये संघर्ष समितीतर्फे जितेंद्र राऊळ, ब्रायन लोबो व रमाकांत पाटील यांनी भाग घेतला.
         समितीतर्फे 14696 हेक्टर सिंचनासाठी असलेल्या सुर्या धरणाचे बहुतांश पाणी बिगर सिंचनासाठी प्रकल्प क्षेत्राबाहेर वळविण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यपाल यांनी आश्चर्य व्यक्त केले. राज्यपाल यांचे सचिव बी वेणूगोपाल रेड्डी व उपसचिव रणजित कुमार हेही बैठकीस उपस्थित होते. या प्रश्नाबाबत राज्यपाल लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत  बैठक आयोजित करणार असून आजच त्यांनी सचिवांना तसे निर्देश दिले.

comments

About Rajtantra

Scroll To Top